भूतानुभव
गोष्ट 1
मराठी कविता - फांद्यांमधूनी चंद्र - बा. भ. बोरकर
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - फांद्यांमधूनी चंद्र कवि - बा. भ. बोरकर अभिवाचक - मंदार कुलकर्णी
मराठी कविता - अहि-नकुल - कुसुमाग्रज
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - अहि-नकुल कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी ओतीत विखारी वातावरणी आग हा वळसे घालित आला मंथर नाग, मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार ये ज्वालामुखिला काय अचानक जाग! कधि लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते, कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवत तृणाची पाती पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती थरथरती झुडुपे हादरती नववेली जग गुलाम सारे या सम्राटापुढती. चालला पुढे तो-काय ऐट!आनंद! अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद, टाकली यमाने कट्यार वा कनकाची चालली बळींचा वेध घेत ही धुंद. वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळुनि पडले भूवर काली. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान् मल्हारातिल तान चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य चालला मृत्युचा मानकरीच महान! हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल, अंगारकणापरि नयन कुणाचे लाल, आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकूल आला!आला देख नकूल! थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, रिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा, भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारुन मरणाचा कानोसा. पडलीच उडी! की तडितेचा आघात! उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात, विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषात! रण काय भयानक, लोळे आग जळात! आदळती,वळती,आवळती क्रोधात, जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व आषाढघनांशी झुंजे वादळवात! क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात वायापरि गेला नकुल वनातुनि दूर. संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती, आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती, पिंजून कापसापरी पडे तो नाग, ते खंड गिळाया जमले किटक भोती!
मराठी कविता - मातीची दर्पोक्ती - कुसुमाग्रज
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - मातीची दर्पोक्ती कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य, उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती थरथरा कापली वर दर्भाची पाती ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत कोलाहल घुमला चहूकडे रानात- अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी ! बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती, मातीवर चढणे एक नवा थर अंती ! कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! पाहून हासु ये तुमचे ताजमहाल अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ? शेकडो ताजही जिथे शोभले काल ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी मातीवर चढणे एक नवा थर अंती ! धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी इकडेच वाहते सर्वांची रहदारी हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति मातीवर चढणे एक नवा थर अंती ! मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ? बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ? मातीतच अंती त्याचेही निर्वाण ? स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मराठी कविता - वामांगी - अरुण कोल्हटकर
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती - कविता कविता - वामांगी कवि - अरुण कोल्हटकर देवळात गेलो होतो मधे तिथे विठ्ठल काही दिसेना रख्माय शेजारी नुसती वीट मी म्हणालो असू दे रख्माय तर रख्माय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढेमागे लागेल म्हणून आणि जाता-जाता सहज रख्मायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रख्माय म्हणाली कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कुणीही नाही म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो, कधी जातो कुठं जातो, काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी-कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगाचं एकटेपण...